Share

शेतकरी आता रेल्वे रुळावर उतरणार; 18 फेब्रुवारीला चार तास ‘रेल्वे रोको’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७५ दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

दरम्यान, बुधवारी संयुक्त मोर्चाने एक मोठी घोषणा केली आहे. प्रजासत्ताक दिनाला टॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर काहीसे शांत झालेले शेतकरी पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत. कारण 18 फेब्रुवारीला 4 तास रेल्वे रोको करण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.

18 फेब्रुवारीला देशभरात दुपारी 12 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत रेल्वे रोको केला जाईल, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर रस्त्यांवर ठाण मांडून बसलेले शेतकरी आता रेल्वे रुळावर उतणार असल्याचं स्पष्ट झालंय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!