🕒 1 min read
उस्मानाबाद : गटविकास अधिकारी नामदेव राजगुरू यांना लोकशाही मान्य नसल्यामुळे ते विकास कामांना अडथळा निर्माण करत होते, असे कळंब पंचायत समितीचे उपसभापती गुणवंत पवार यांनी सांगीतले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नामदेव राजगुरू यांना शासनाकडे परत बाेलवावे, असा ठराव मासिक सभेत सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन घेतला आहे. असे ते म्हणाले. गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावरून शुक्रवारी सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली.
कळंब पंचायत समितीची शुक्रवारी मासिक सर्वसाधारण सभा होती. इतिवृत्त व शासन परिपत्रकांचे वाचन, उपकर योजना खर्च आढावा, उपकर योजनेच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाचे नियोजन, नोंदवह्या मान्यता, महाग्रारोहयो लेबर बजेटला मंजूरी देणे, असे विषय या बैठकीच्या अजेंड्यावर होते. सभापती संगिता गोविंद वाघे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी पं.स. सभागृहात सुरू झालेल्या या बैठकीस उपसभापती गुणवंत पवार, माजी उपसभापती भगवान ओव्हाळ यांच्यासह गटविकास अधिकारी नामदेव राजगुरू, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय कोरडे, एबीडीओ प्रमोद कुसनेन्नीवार यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी सदस्यांनी गटविकास अधिकारी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाहीत, घरकुलांची कामे प्रलंबित आहेत, विकासाच्या दृष्टीने ठराव घेण्यात येत नाहीत, बाहेर घडलेल्या गोष्टी ठरावामध्ये घेतात, सदस्यांना योग्य तो सन्मान देत नाहीत,यांसह अनेक कामकाजामधील चुकांचा पाढा वाचण्यास सुरूवात केली. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नामदेव राजगुरू तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. काही दिवसांपासून गटविकास अधिकारी व पंचायत समिती सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि पंचायत समिती सदस्य व प्रशासनामधील वाद सुरू झाला. त्यामुळे सर्व सदस्यांनी गटविकास अधिकारी नामदेव राजगुरू यांना परत पाठवावे, अशी मागणी सभागृहात केली.
महत्वाच्या बातम्या
- महावितरणाविरोधात भाजपचे ‘टाळे ठोको व हल्लाबोल’ आंदोलन
- अंदाज वर्तवण्याखेरीज फडणवीसांच्या हाती आता काहीही राहिलेले नाही; सुभाष देसाईंचा टोला
- ‘पिकेल ते विकेल’अंतर्गत आव्हाना येथे रयत बाजार
- 2009 च्या निवडणुकीत ‘ध’ चा ‘प’ कसा झाला हे मला आजपर्यंत कळालेले नाही- धनंजय मुंडे
- अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ; सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
