🕒 1 min read
पुणे:- महाविकास आघाडी सरकारची स्थापन होऊन एक वर्ष उलटून गेले आहे. ठाकरे सरकार सध्या स्थिरावले असून सर्वात जास्त आमदार निवडून आले असतानाही भाजपला मात्र, सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. दोन दशके युतीत असणाऱ्या शिवसेनेने युती तोडत मुख्यमंत्रीपद मिळवले. शिवसेनेचे हे यश भाजपला पचलेले नाही. त्यामुळे भाजप नेते वारंवार ‘सरकार पडणार’चा जप करताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिलेत. फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं म्हणत राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली आहे.
दरम्यान, आता शिवसेना नेते व मंत्री सुभाष देसाई यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार स्थिर झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा वाढता विश्वास आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चार वर्षे सत्तेचे स्वप्न बघत राहावे लागेल, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाविद्यालय प्रशासनाच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
- ‘चायना आणि पाकिस्तानच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही इतका शेतकऱ्यांसाठी केलाय’
- गेल्या वर्षभरात खडसे,सरनाईक यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांना आल्या आहेत ईडीच्या नोटीसेस
- यामुळे झाले ह्युन्दाईच्या क्रेटाचे डीझेल मॉडेल बंद !
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
