फुलंब्री : विद्युत वितरणच्या मनमानी कारभाराविरोधात तालुका भाजप तर्फे येथील महावितरण कार्यालयास टाळा ठोकून हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. तार कुंपण गेटला १५ मिनिटे कुलूप राहिले, परंतु कार्यकर्ते जाताच कार्यालय पूर्ववत सुरू झाले.
राज्यात ७५ लाख वीज ग्राहकांना बिला अभावी वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे षडयंत्र महावितरणचे आहे. या नोटिसामुळे नागरिकांत भीती व संताप निर्माण झाला, कोरोनाच्या महामारीतून जनता सावरत आहे. तोच महावितरण ने दणका देण्यास सुरुवात केली आहे. येथील कनिष्ठ अभियंता आर.आर.मिरगणे यांना निवेदन देण्यात आले.
दुपारी एक ते दीड च्या दरम्यान उपअभियंता कार्यालया समोर घोषणा बाजी करून कार्यालयाच्या तार कुंपणाच्या छोट्या गेटला कुलूप लावण्यात आले. भाषण होऊन कार्यकर्ते जात नाही तोच दहा ते १५ मिनिटात वाचमनने कुलूप उघडले व सर्व कामकाज नियमित सुरू झाले.
यावेळी तालुकाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, जि.प. महिला बाल कल्याण सभापती अनुराधा चव्हाण, जि.प.सदस्य शिवाजीराव पाथ्रीकार, सभापती सविता फुके, मंगला वाहेगवकर, सुशीला फुके, ऐश्वर्या गाडेकर, सोनाली सोनवणे, वाल्मिक जाधव, अजय शेरकर, बाळासाहेब सोटम, संजय त्रिभुवन, नरेंद्र देशमुख, यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- महाविद्यालय प्रशासनाच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
- ‘चायना आणि पाकिस्तानच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही इतका शेतकऱ्यांसाठी केलाय’
- गेल्या वर्षभरात खडसे,सरनाईक यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांना आल्या आहेत ईडीच्या नोटीसेस
- यामुळे झाले ह्युन्दाईच्या क्रेटाचे डीझेल मॉडेल बंद !
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…


