बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून करुणा आणि रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहेत.ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते आहेत सोबतच सामाजिक न्याय विभागाचे मंत्रिपद देखील ते सांभाळत आहेत त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे पडसाद राज्यभर पाहायला मिळाले.
मुंडे हे पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. ते काही काळ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. गोपीनाथ मुंडे जेव्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हा बीडमधला त्यांचा वारसदार म्हणून त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण पाहत होते.
2009 मध्ये या पटावर पंकजा मुंडेंची एंट्री झाली आणि सगळे चित्रच पालटून गेले. 2009 साली झालेल्या काही घडामोडींमुळे भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला मात्र २००९ साली झालेल्या काही घटनांची सल आजही मुंडे यांच्या मनात असल्याचं दिसून येत आहे.
परळीत एका कार्यक्रमात बोलताना मुंडे यांनी त्यांच्या विरोधात पूर्वीपासून आतापर्यंत होत आलेल्या कुरघोड्यांचा पाढा वाचला. यावेळी बोलताना त्यांनी २००९ साली घडलेल्या षड्यंत्राचा देखील उल्लेख केला. मुंडे म्हणाले,राजकारण एवढे वाईट झाले आहे कि एखाद्या व्यक्तीला जेव्हा मैदानात हरवता येत नाही तेव्हा त्याला पूर्णपणे उधवस्त करायचं कसं याबाबत षड्यंत्र रचले जातंय.माझं आयुष्यच २००२ पासून षड्यंत्रात गेले आहे. २००२ साली अध्यक्ष होण्याची वेळ आल्यावर आमच्याच सहकाऱ्यांनी सदस्य का पळवून नेले हे षड्यंत्र मला कधी काळाले नाही.
२००९ साली उमेदवारी मिळण्याचं ठरल्यावर ‘ध’ चा ‘प’ कसा झाला हे मला आणखीन काळालं नाही त्यामागे काय षड्यंत्र होते. आज इथपर्यंत आल्यावर सुद्धा मला काय षड्यंत्र चाललं आहे हे मला कळत नाही.मी राजकारणात समाजकारणासाठी आलो आहे हे तुम्हाला माहित आहे. याभागातील शेतकऱ्याला साधन करायचं आहे. हा माझा प्रामाणिकपणा जर कुणाला आडवा येत असेल आणि हा प्रामाणिकपणा कुणी संपविण्याचा कुणी प्रयत्न करणार असेल तर मायबाप जनता तुम्हीच न्याय करा असं भावनिक आवाहन देखील त्यांनी केले.
2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले त्यानंतर या रिक्त जागेवर धनंजय यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती मात्र तर ऐनवेळी पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. यानंतर मुंडे काका पुतण्यामध्ये सुरु झालेला संघर्ष अवघ्या महाराष्ट्राने पाहिला.काल बोलताना मुंडे यांनी त्या कठीण काळाचा उल्लेख करत त्यांच्या मनात अजूनही त्या गोष्टीची सल असल्याचे दाखवून दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- सामाजीक सुरक्षा कायद्यात उसतोड मजुरांचा समावेश करण्यात यावा: आमदार धस
- ‘चायना आणि पाकिस्तानच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही इतका शेतकऱ्यांसाठी केलाय’
- गेल्या वर्षभरात खडसे,सरनाईक यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांना आल्या आहेत ईडीच्या नोटीसेस
- यामुळे झाले ह्युन्दाईच्या क्रेटाचे डीझेल मॉडेल बंद !
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
