🕒 1 min read
गेल्या जून महिन्यापासून सुशांत सिंह राजपूतचे संशयित आत्महत्त्या प्रकरण देशभर गाजत आहे. सुशांत बद्दल देशभरात सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. यात भारतातील विविध वृत्तवाहिन्यांनी उडी घेल्यामुळे या प्रकरणाचे रिपोर्टिंग एकतर्फी होत असल्याचे आरोप होत आहेत. यामुळे रिपब्लिक वृत्त वाहिनीचे प्रधान संपादक अर्णब गोस्वामी यांना टीकेचा भडीमार सहन करावा लागत आहे. मुंबई पोलिसांनी ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत आत्महत्त्या प्रकरणाचा तपास केला याबाबत शंका उपस्थित करत अर्णब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
अर्णब गोस्वामी यांनी राज्यातील मोठ्या नेत्यांना अंगावर घेतले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणामुळेही अर्णब गोस्वामी अडचणीत आले होते. दरम्यान, अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलिबाग न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना अर्णब गोस्वामी यांच्यासह दोघांना 10 मार्चच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिलेत. याबाबत अलिबाग कोर्टाने आरोपींच्या वकिलांना सक्त ताकिद दिली आहे. त्यामुळे अर्नब गोस्वामींना स्वतः न्यायालयात हजर होण्याची नामुष्की टाळता येणार नाही.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाच्या सुनावणीत तिन्ही आरोपी गैरहजर होते. त्यामुळे न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. तसेच 10 मार्चला होणाऱ्या पुढील सुनावणीला तिन्ही आरोपींना हजर राहण्याचे निर्देश दिलेत. हजर न राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचाही इशाराही न्यायालयाने दिला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
