Share

‘पिकेल ते विकेल’अंतर्गत आव्हाना येथे रयत बाजार

Published On: 

सिल्लोड : राज्य सरकारच्या पिकेल ते विकेल अभियानांतर्गत बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव व ग्राहकांना ताजी फळे भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध व्हावे तसेच शेतकऱ्यांच्या बरोबर ग्राहकांना देखील याचा लाभ होईल या अनुषंगाने विक्री धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाचा आव्हाना येथे बुधवारी दि.३ प्रारंभ झाला.

या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कृषी व संलग्न विभागाच्या तसेच सहकार पणन नाबार्ड पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची सांगड घालण्यात येईल विविध योजना अंतर्गत शेतकरी गटांना उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी तयार केलेला शेतमाल थेट विक्री करता पोहोचून दिलासादायक काम केले जाईल नवीन पिढी शेतामध्ये विविध प्रयोग करत आहेत.

त्यांच्या मालाला चांगला भाव भेटावा व बाजारपेठा उपलब्ध व्हाव्यात त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने सदर अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी सभापती विनोद गावंडे, माजी सभापती भानुदास सरोदे, योगेश गावंडे, मंडळ कृषी अधिकारी बी.जी.सुरडकर, कृषी पर्यवेक्षक व्ही.पी.भोसले, कृषी सहाय्यक एन.एन.गावंडे तसेच शेतमाल उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!