🕒 1 min read
उस्मानाबाद : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना प्रतिमहिना ५०० रुपयांप्रमाणे चार महिन्यांत दोन हजार रुपये असे वर्षभरात सहा हजार रुपये जमा करण्यात आले येतात. या योजनेत बहुतांश शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचा लाभ मिळाला. परंतु शासकीय नोकरदार, करदाता दहा हजारावरील पेन्शनधारक, डॉक्टर, अभियंता, सीए, आर्किटेक्ट, माजी-आजी आमदार आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदी अपात्रतेचे निकष आहेत.
या निकषानुसार तेर येथे ६२ लाभार्थ्यांना अपात्र ठरवत डिसेंबर २०२० मध्ये पहिली नोटीस दिली होती. पुढील टप्प्यात वसुलीसाठी महसूल विभागाने तेर येथील २४ शेतकऱ्यांना दुसरी नोटीस बजावली आहे. पैसे भरा अन्यथा कार्यवाहीला सामोरे जा, अशी ताकीद त्यांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत अपात्र असूनही लाभ उचललेल्या धनदांडग्या शेतकऱ्यांना महसूल विभागाने अपात्र ठरवले होते. दरम्यान, तेर येथील २४ शेतकऱ्यांनी कार्यवाही टाळण्यासाठी रक्कम भरुण सहकार्य करावे, असे आवाहन तलाठी श्रीधर माळी यांनी केले आहे.
पहिली नोटीस दिल्यांनतर पैसे भरा अन्यथा कार्यवाहीला सामोरे जा, अशी ताकीद त्यांना देण्यात आली आहे. त्यानुसार १५ दिवसात रक्कम भरण्यास सांगितले होते. त्यामुळे येथील ६२ पैकी ३६ शेतकऱ्यांनी ही रक्कम भरली आहे. परंतु तेरमधील २४ अपात्र लोकांनी महसूलच्या नोटीसला जुमानले नाही. त्यामुळे महसूल विभागाने अपात्र शेतकऱ्यांना दुसरी नोटीस बजावली आहे. उचललेली रक्कम पाच दिवसात भरली नाही तर वसुलीच्या विधीनुसार कार्यवाही करण्याची ताकीद त्यात देण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे नोडल अधिकारी व तहसीलदार गणेश माळी यांनी योजनेतील अपात्र शेतकऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भाजपचा एकही नेता शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाही- अजित पवार
- महाविद्यालय प्रशासनाच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
- मनपा निवडणुकीत उमेदवारीसाठी महिला आघाडीची शिवसेना नेत्यांसोबत चर्चा
- मोठी बातमी : शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार : राकेश टिकैत
- दत्ता भरणे मंत्री झाले पण कधी जॅकेट घातलं का?; अजित पवारांचे हर्षवर्धन पाटलांना चिमटे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
