इंदापूर:- दत्तामामा भरणे मंत्री झाले पण कधी जॅकेट घातलं का? मी कधी घालतो का? असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहिल्यांदाच इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा अजितदादा यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आणि आपल्या कार्यकर्त्यांना एक मोलाचा सल्लाही दिलाय.
यावेळी अजित पवार यांनी तुमच्या दत्तात्रय भरणेंना मंत्री केल्याचं इंदापूरवासियांना सांगितलं. सार्वजनिक बांधकाम खातं त्यांच्याकडे आहे. रस्त्याची सगळी कामे पठ्ठ्याकडेच, अशोकराव चव्हाणही त्यांना मदत करतात. सामान्य प्रशासन विभाग जे खातं मुख्यमंत्री ठेवतात त्याचं राज्यमंत्रीपद दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिलं आहे. मामा मंत्री म्हणून नवखा आहे. पण, पाठपुरावा करायला चिकट आहे, असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- कृषी कायद्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार, औरंगाबादेत चक्का जाम
- ‘भाजप-शिवसेनेची केंद्रात व राज्यात सत्ता असताना औरंगाबादचं नामांतर का झालं नाही?’
- गंगाखेडच्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तीन जणांना अटक, पिस्तूलही केले जप्त
- अदानी पवारांच्या घरी गेल्यामुळे आता वीज बिल माफ होणार नाही : राज ठाकरे
- फोटोसेशनच्यावेळी फोटोग्राफरच्या कृत्यानंतर नवरदेवाने केले असे काही…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

