Share

मनपा निवडणुकीत उमेदवारीसाठी महिला आघाडीची शिवसेना नेत्यांसोबत चर्चा

Published On: 

औरंगाबाद : शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार तथा जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांच्यासह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. आगामी मनपा निवडणुकीमध्ये महिलांना या वेळी 50 टक्के आरक्षणानुसार उमेदवारी मिळावी, याबाबत चर्चा करण्यात आली.

या चर्चेमध्ये महिला आघाडीच्या सदस्या, कार्यकर्त्या, पदाधिकारी, नेत्या या उच्चशिक्षित आहेत. तसेच अनेक वर्षांपासून पक्षाचे अविरतपणे कामे देखील सुरू आहेत. कोणत्याही निवडणूकांमध्ये शिवसेनेची महिला आघाडी स्व:त हून जबाबदारी घेवून 100 टक्के मतदान तसेच कसे होईल, या बाबत नियोजन करुन काम नेहमी करत असते. त्या मुळेआता मनपा निवडणूकीमध्ये आम्हाला उमेदवारी देण्याची मागणी सर्व महिला पदाधिकारी यांनी नेत्यांकडे केली.

आणि यावर शिवसेनेच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही दिलेली जबाबदारी पाड पाडत असतो. यावर माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे, आैरंगाबाद महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख आमदार डॉ. मनिषा कायंदे तसेच शहरातील आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांनी वार्डनिहाय सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या कामाचा तपशिल राज्याचे उद्योगमंत्री तसेच पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या कडे देणार असल्याचे सांगितले.

तसेच या बाबत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही माहिती सांगणार असल्याचे या वेळी सांगितले. अनेक वार्डामध्ये इच्छुकांची सख्या मनपा निवडणूका घोषीत होण्याच्या अगोदर वाढत चालली आहे. अशीच एकंदरीत परिस्थिती बघावयास मिळते. दरम्यान राज्यामध्ये महाविकास आघाडी असल्याने मनपा निवडणूकीसाठी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत निवडणूक लढवणार का? यावर औरंगाबादकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
आता तब्बल 25 वर्षांनंतर ( मधला एक अपवाद वगळता) भारतीय जनता पक्षासोबत महायुती राहिलेली नाही. परिणामी आता शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार का? आता शिवसेनेचा विरोधात भाजप आहे हे मात्र नक्की. भाजप सोबत शिवसेना असल्याने अनेक वार्डामध्ये निवडणुकीत शिवसेना प्रबळ असूनदेखील जागा सुटलेल्या नव्हत्या. तर भाजपमध्येही अशीच काहीशी परिस्थिती पहावयास मिळते.

आता यावर शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व तसेच लोकप्रतिनिधी कश्या प्रकारची रणनिती आखतात आणी महिला आघाडीच्या महिलांना उमेदवारी कश्या पद्धतीने मिळते हे पाहणे औत्स्युक्याचा विषय असणार आहे. आम्ही आता आमचे सर्वोच्च नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, डॉ. मनिषा कायंदे यांच्या नेतृत्वात मनपा निवडणूक लढवणार आहोत. खुप दिवसांची आमची मागणी या वेळी पुर्ण होणार आहे.
– सुनीता देव, जिल्हा संघटक, शिवसेना महिला आघाडी.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!