औरंगाबाद : शहरातील कमलनयन बजाज नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांयाने महाविद्यालय प्रशासनाच्या छळाला कंटाळून शुक्रवारी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला वेळीच रुग्णालयात हलविण्याने अनर्थ टळला. साहिल विजय लव्हारे असे विद्यार्थ्याचे नाव असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
गृहपाठ पूर्ण झाल्याने महाविद्यालयातील प्रशासनाने घरच्यांना साहिल बद्दल सांगितल्याचे मनात धरून तसेच घरच्यांची सतत येणारे फोन याचा ताण घेत साहिल याने महू नगर बीड बायपास येथील राहत्या खोलीत विषारी द्रव्य प्राशन केले ही बाब त्याचा सोबती विश्वजीत राऊत याला कळताच त्याने साहिलला रुग्णालयात दाखल केले सध्या साहिरची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे
तसेच महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांवर काही न काही कारणाने शक्ती होत असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्र हाती घेतला तसेच प्रशासनाने अतिरिक्त शक्ती कमी करावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद ठेवण्याची मागणी यावेळी केली विद्यार्थ्यांसोबत जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
महाविद्यालय प्रशासन बोलण्यास तयार नसल्याने विद्यार्थी राष्ट्रवादी विद्यार्थीच्या वतीने ठिय्या आंदोलनास बसलेले होते. प्रशांत कदम पाटील मराठवाडा अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, सादिक शेख, अमित कुटे, सुशील बोराडे, सारंग बोराडे, अमोल धंदरे, आकाश हिवराळे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- सामाजीक सुरक्षा कायद्यात उसतोड मजुरांचा समावेश करण्यात यावा: आमदार धस
- ‘चायना आणि पाकिस्तानच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही इतका शेतकऱ्यांसाठी केलाय’
- गेल्या वर्षभरात खडसे,सरनाईक यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांना आल्या आहेत ईडीच्या नोटीसेस
- यामुळे झाले ह्युन्दाईच्या क्रेटाचे डीझेल मॉडेल बंद !
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
