Share

भाजपचा एकही नेता शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाही- अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

इंदापूर:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

दरम्यान, शेतकरी पुढे येऊ नयेत म्हणून तुम्ही खिळे मारता, जमाव रेटत नसेल तर पाणी फवारता, अश्रूधुराच्या नळकांड्या वापरतात. खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य खासदारांची अडवणूक केली जाते. मीडियातून आवाज उठल्यानंतर खिळे काढण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना किती कष्ट पडतात याचा विचार व्हायला नको? आताचे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर सत्तेत आलं आहे. पण तरीही शेतकरी प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातंय. भाजपचा एकही नेता शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाही हे दुर्दैव आहे, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केली आहे.

जगातल्या कोणत्याच देशात असं संकट शेतकऱ्यांवर ओढवलेलं नाही इतकी भयानक स्थिती भारतात आहे. परदेशातील सेलिब्रेटीनं ट्विट केलं म्हणून तुम्ही त्यांना ट्रोल करता? इतके दिवस तुम्ही का बोलला नाही, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!