🕒 1 min read
मुंबई : 26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राज ठाकरे यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावरती जामीन मंजूर झाला आहे.
राज ठाकरेंना यापूर्वी 2018 आणि 2020 मध्ये समन्स काढण्यात आले होते. मात्र, त्यावेळी राज ठाकरे उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे राज ठाकरेंना वॉरंट काढलं गेलं. राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर उपस्थित होते. राज ठाकरेंना वॉरंट काढल्यानं मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात वाशी टोलनाका परिसरात जमा झाले होते.
दरम्यान, राज ठाकरे येणार असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ग्रँड वेलकम केलं. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा नक्कीच मनसेला होईल अशी आशा मनसैनिकांना वाटत आहे. तत्पूर्वी मनसेने ‘शेकडो गुन्हे दाखल केले गेले असले तरी ज्वलंत विचार आणि बुलंद आवाज रयतेच्या न्याय्य-हक्कांसाठी घुमणारच…!’ असा थेट इशाराच सरकारला दिला होता.
शेकडो गुन्हे दाखल केले गेले असले तरी ज्वलंत विचार आणि बुलंद आवाज रयतेच्या न्याय्य-हक्कांसाठी घुमणारच…!
सन्मा. राजसाहेब ठाकरे ह्यांना नवी मुंबई न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश.
शनिवार, ६ फेब्रुवारी २०२१, सकाळी ११ वा.
स्थळ : बेलापूर न्यायालय, नवी मुंबई.#महाराष्ट्रधर्म pic.twitter.com/RorE6IiFwF— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 5, 2021
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : राज ठाकरे यांना जामीन मंजूर !
- ‘जो पर्यंत मोदी- शहांच समर्थन तो पर्यंत मी मुख्यमंत्री’
- ‘ड्रग्ज अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?’
- दानशूर कर्णाची उपमा देणे योग्य राहील असं कुणी विचारलं तर त्याचे उत्तर असेल फक्त रतन टाटा
- दावा तर मुख्यमंत्री पदावर देखील करता येऊ शकतो, भुजबळांचा कॉंग्रेसला अप्रत्यक्ष टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
