🕒 1 min read
सांगली:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने विचारपूस करणे गरजेचे होते. पण तसे न करता त्यांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करून पाप केले आहे. हुकूमशाही पद्धतीने मोदी सरकारने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्यांना इतिहास कधी माफ करणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते तथा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
दरम्यान, कृषी कायद्यावरून संसदेत जोरदार रणकंदन सुरू असतानाच आज आंदोलक शेतकऱ्यांनी देशभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. राजधानी दिल्लीला या आंदोलनातून वगळण्यात आलं असून, देशभरात तीन तास आंदोलन केलं जाणार आहे. कृषी संयुक्त किसान मोर्चाने याबद्दल शुक्रवारी माहिती दिली होती. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर आंदोलन केलं जाणार असून, कोणत्या वाहनांना जाण्यास मूभा दिली जाईल, याबद्दलही मोर्चानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनला पाठिंबा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : राज ठाकरे यांना जामीन मंजूर !
- ‘जो पर्यंत मोदी- शहांच समर्थन तो पर्यंत मी मुख्यमंत्री’
- ‘ड्रग्ज अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?’
- दानशूर कर्णाची उपमा देणे योग्य राहील असं कुणी विचारलं तर त्याचे उत्तर असेल फक्त रतन टाटा
- दावा तर मुख्यमंत्री पदावर देखील करता येऊ शकतो, भुजबळांचा कॉंग्रेसला अप्रत्यक्ष टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
