Share

मुंबई महापालिकेला १० हजार कोटींचा तोटा !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोरोनामुळे मुंबई महापालिकेला मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागल्याचं स्पष्ट झालं आहे. महापालिकेने आज २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला असून त्यात पालिकेला कोरोनामुळे सुमारे १० हजार कोटीचा तोटा सहन करावा लागल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे महापालिकेला या आर्थिक वर्षासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे लागणार आहेत.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प ३९०३८.८३ कोटीचा आहे. गेल्या वर्षी पालिकेचा अर्थसंकल्प ३३४४१.०२ कोटी एवढा होता. म्हणजे पालिकेच्या उत्पन्नात घट झाली असली तरी पालिकेचा अर्थसंकल्प १६.७४ टक्क्याने वाढला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. तसेच मालमत्ता कर जैसे थे ठेवण्यात आला असून मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यात आणि मुंबई महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे. मात्र, असं असतानाही ठाकरे सरकारकडून पालिकेला त्यांची वसुली करता आलेली नाही. ठाकरे सरकारकडे पालिकेचे विविध हेडअंतर्गत ५२७४.१६ कोटी थकले आहेत. त्यात राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडूनच ३६२९.८३ कोटी रुपये थकले आहेत. तर, एमएमआरडीएकडे पालिकेचे १२१ कोटी रुपये थकलेले आहेत. राज्यात काँग्रेसची सत्ता असताना हे पैसे मिळावेत म्हणून शिवसेनेकडून पालिकेत रणकंदन केलं जायचं. मात्र, राज्यात आणि पालिकेतही शिवसेनेचीच सत्ता असून आता हे पैसे पालिकेला का मिळत नाहीत? असा सवाल पालिकेतील विरोधकांकडून केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!