🕒 1 min read
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) सहआयुक्त रमेश पवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पाण्याऐवजी चुकून सॅनिटायझर प्राशन केले. या घटनेचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने प्रसिद्ध केला आहे. यात रमेश पवार अधिकाऱ्यांसमवेत बसलेले दिसून येत असून ते टेबलवर ठेवलेली सॅनिटायझरची बाटली पाणी समजून पिताना दिसत आहेत.
#WATCH: BMC Joint Municipal Commissioner Ramesh Pawar accidentally drinks from a bottle of hand sanitiser, instead of a bottle of water, during the presentation of Budget in Mumbai. pic.twitter.com/MuUfpu8wGT
— ANI (@ANI) February 3, 2021
या घटनेनंतर जवळच उभ्या असलेल्या महापालिका कर्मचाऱ्याने धावत जाऊन त्यांना थांबवले आणि पाण्याची खरीखुरी बाटली हातात दिली. कोरोना महामारीमुळे सॅनिटायझर सर्वांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे, पण ते प्यायल्याने गंभीर परिणामही होऊ शकतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
I thought that I should drink water before starting my speech so I lifted the bottle & drank. Bottles of water & sanitiser kept there, were similar. So it happened. As soon as I drank it, I realised the mistake & didn't gulp it all the way down: Ramesh Pawar, BMC Jt Commissioner pic.twitter.com/xCKBaTey9v
— ANI (@ANI) February 3, 2021
याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना रमेश पवार म्हणाले, भाषण सुरू करण्यापूर्वी मला पाणी पिण्याची इच्छा झाली, म्हणून समोर ठेवलेली बाटली उचलून पिण्यास सुरुवात केली. पाण्याची आणि सॅनिटायझरची बॉटल एकसारखीच असल्याने हे घडले. मी ते प्यायल्याबरोबरच ती चूक माझ्या लक्षात आली.
दरम्यान, नुकतेच यवतमाळ जिल्ह्यात पोलिओ डोसच्या दोन थेंबांऐवजी सॅनिटायझरचे थेंब पाजण्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे तेथील 12 बालके आजारी पडली.
महत्वाच्या बातम्या
- रिहानाविरुद्ध आता बॉलीवूडचा खिलाडी, सिंघम मैदानात, गैरसमज पसरवणाऱ्यांनाही सुनावले खडे बोल
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनात सहाभागी झाल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही
- ‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही’; जगप्रसिद्ध पॉपस्टारला कंगनाच प्रतिउत्तर !
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
