Share

वीज जोडणी कट करायला गेलेल्या विद्युत कर्मचाऱ्यास परभणीत बेदम मारहाण

Published On: 

🕒 1 min read

परभणी : वीज बिल भरलेले नसल्याने घराची वीज बंद करण्यास आलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास एकाने थापड-बुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.3) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज वितरण कंपनीचे कर्मचारी अशोक कच्छवे यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास लक्ष्मीनगरातील साळवी यांच्या घरी आपण इतर कर्मचाऱ्यांसह गेलो होतो. 20 नोव्हेंबर 2019 पासून 14 हजार 770 रुपयांची थकबाकी त्यांच्याकडे असल्याने त्यांना बिलाची थकबाकी भरण्याबाबत वेळोवेळी सूचना केल्या.

मात्र, त्यांनी थकबाकी भरली नाही. त्यामुळे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास साळवी यांच्या घरी गेलो व बील भरले नसल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार लाईन कट करत असल्याचे त्यांना सांगितले. त्यावेळी कांबळे नामक त्यांच्या व्यक्तीने तेथे येऊन आपणास शिवीगाळ करू लागला. त्यावेळी आपण शिव्या देऊ नका, असे म्हटले असता त्याने थापड बुक्यांनी आपणास मारहाण केली. तसेच यानंतर लाईन कट करण्यास आला तर जीवे मारील, अशी धमकी दिली.

अशोक कच्छवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नानलपेठ पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चिरंजीव दलालवाड हे अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!