🕒 1 min read
मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं आहे. यासंदर्भात पोलिसांना त्यांनी लेखी लिहून दिलं आहे. गेल्या काही काळापासून तिची बहिण आणि मुंडे यांच्यात सलोख्याचे संबंध नव्हते. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली होती, असं रेणू शर्माने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. त्यानंतर मुंडे यांच्यावरील संकट टळले असल्याचे स्पष्ट झाले होते.
मात्र, आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा शर्मा यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडेविरोधात तक्रार केली आहे. गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
‘माझे पती धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपून ठेवले आहेत. मला त्यांच्याशी भेटू देत नाही. २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर जाताच, मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना बोलावून मला हकलून लावले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाही.’ अशाप्रकारचा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.
दरम्यान, यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी भाष्य केले आहे. ‘धनंजय मुंडे यांचे मोठे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करताना काही लोक दिसत आहेत, धनंजय मुंडे हे पराक्रमी योद्धा आहेत अशा पद्धतीने त्यांचे स्वागत केले जात आहे. परंतु, त्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले आहेत याची कबुली त्यांनी स्वतःच दिलेली होती. त्यानंतर रेणू शर्मा यांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांकरवी झाला होता. त्यानंतर आज पुन्हा करुणा शर्मा यांनी जर असा तक्रारी अर्ज दिला असेल तर धनंजय मुंडे यांचे जल्लोषात स्वागत करणारे आणि मोठमोठे सत्कार करणाऱ्यांची मानसिकता आपल्याला तपासावी लागेल. आणि असेच चालू राहिले तर काही काळाने जर एखादा नेता, एखादा मंत्री अत्याचाराचे आरोप असलेले किंवा आरोपी जरी ठरला तरी त्याचे स्वागत करतील.’
तृप्ती देसाई यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी परिवार संवाद साधताना, राष्ट्रवादी पक्षातील मंत्र्यांचे परिवार सुरक्षित आहेत का हे पण पाहिले पाहिजे आणि त्याविरोधात राष्ट्रवादीतील सर्व महिला नेत्यांनी आवाज उठवला पाहिजे’ असे म्हणत तृप्ती देसाई यांनी राष्ट्रवादीसह धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- रिहानाविरुद्ध आता बॉलीवूडचा खिलाडी, सिंघम मैदानात, गैरसमज पसरवणाऱ्यांनाही सुनावले खडे बोल
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- प्यायचे होते पाणी, पण चुकून प्यायले सॅनिटायझर; BMCचे सहआयुक्त रमेश पवारांकडून घडली चूक
-
शेतीतलं ना राहुल गांधींना काही कळतं, ना रिहानाला – संबित पात्रा
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
