मुंबई : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस झाले आहेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले आहेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना दरम्यान २६ जानेवारी रोजी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. यावेळी, पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्चक्री उडाली. यावेळी शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर आपला झेंडा फडकवताना तिरंग्याचा अवमान केल्याचे म्हटले जात आहे. यावर ‘मन की बात’मध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘२६ जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान झाला. त्यामुळे देश दु:खी झाला’ असे म्हणत खेद व्यक्त केला आहे.
यावरून अग्रलेख लिहित संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. ‘सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पंतप्रधानपदावर कोणीही विराजमान असो, तिरंग्याचे रक्षण करणे हे त्याचे प्रथम कर्तव्य ठरते. म्हणूनच मोदी यांच्या भावना त्यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत. पण 26 जानेवारीस म्हणजे प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचा जो राजकीय धुरळा उडवला जात आहे तो कितपत योग्य आहे? साठ दिवसांपासून आंदोलन करणाऱया शेतकऱ्यांचा एक गट त्या दिवशी लाल किल्ल्यावर घुसला. त्यांनी हडकंप माजवला. त्यात तिरंग्याचा अपमान झाल्याचा प्रचार भाजप सायबर फौजांनी केला. तो अपप्रचारच ठरला. जे चित्रीकरण समोर आले त्यात तिरंग्याचा अपमान वगैरे झाल्याचे कुठेच दिसत नाही. तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकतच होता, पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले हे उघड झाले. तिरंगा आम्हाला ‘जान से प्यारा’ आहे. भाजपच्या सायबर टोळधाडीस तिरंगा जितका प्यारा आहे त्यापेक्षा जास्त तो गाझीपूरच्या आंदोलक शेतकऱयांना प्यारा आहे’ असे म्हणत आजच्या सामनाच्या अग्रेलाखातून भाजपवर आणि मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता मुंबईकरांना सोयीनुसार लोकल प्रवास करता येणार ? राजेश टोपेंनी दिले संकेत
- ‘तिजोरीत खडखडाट असतानाही शेतकऱ्याला आमच्या सरकारने हजारो कोटी रुपयांची मदत केली’
- रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनात सहाभागी झाल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही
- मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहात का? – नवाब मलिक
- महाराष्ट्रातील कुशल, होतकरु तरुणांचा शोध घेऊन त्यांना जगासमोर आणा – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
