🕒 1 min read
मुंबई:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
दरम्यान, दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असून त्या भागाला सध्या छावणीचे स्वरूप आले आहे, असे नमूद करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसोबत युद्ध लढणार आहेत का?, असा बोचरा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
तुम्ही शेतकऱ्यांसाठी बंदोबस्त लावलाय की पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवर बंदोबस्त लावलाय, अशी विचारणा करतानाच जनरल डायर नीतीने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपणे योग्य नाही, अशा शब्दांत मलिक यांनी टोला लगावला आहे. ही सगळी परिस्थिती निर्माण करून दडपशाहीच्या मार्गाने शेतकरी आंदोलन संपवण्याचा डाव केंद्र सरकारने आखला आहे. लोक हे कदापि स्वीकारणार नाहीत. ही डायर नीती केंद्राने तत्काळ थांबवावी, असेही मलिक यांनी केंद्र सरकारला ठणकावले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता मुंबईकरांना सोयीनुसार लोकल प्रवास करता येणार ? राजेश टोपेंनी दिले संकेत
- ‘शरजीलवर कारवाई का होत नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे’
- रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनात सहाभागी झाल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही
- मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहात का? – नवाब मलिक
- महाराष्ट्रातील कुशल, होतकरु तरुणांचा शोध घेऊन त्यांना जगासमोर आणा – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
