🕒 1 min read
औरंगाबाद : तीन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख हे औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यापूर्वीही गेल्या महिन्यात त्यांनी औरंगाबादचा दौरा केला. त्या दौऱ्यातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे देशमुख हे अडचणीत सापडलेत. त्यात गृहमंत्री देशमुख तीन गुन्हेगारांसोबत उपस्थित असल्याचे दिसत आहे. यावर विरोधकांकडून टीका होत आहे. फोटोतील कलीम कुरेशी, सय्यद मतीन, जफर बिल्डर या तिन्ही गुन्हेगारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. असे असताना राज्याच्या गृहमंत्र्यांना त्यांच्याबरोबर उपस्थित राहणे किती संयुक्तिक यावर सध्या राज्यात चर्चा सुरु आहे.
या तीन जणांपैकी एकावर 500 ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल आहे. दुसऱ्यावर अत्याचार आणि इतर गुन्हे दाखल आहेत. तडीपारीची देखील कारवाई प्रस्थावित आहे. तर अन्य एकावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील दोन जण एमआयएमचे माजी नगरसेवक आहे. तर सय्यद मतीन याची एमआयएमने पक्षातून हकालपट्टी केली आहे. या तिघांवर औरंगाबाद शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यातील सय्यद मतीन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे तो बराचकाळ जेलमध्ये होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील पोलीस हातकड्या घालून हजेरी लावत होता.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांच्या समवेत एक गुन्हेगार उभा असल्याचा फोटो समोर आला होता. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना देखील एका गुन्हेगारांसोबत फोटो पाहायला मिळाला. मात्र येथे गुन्हेगारांच्या मधेच गृहमंत्री असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोण आहेत हे गुन्हेगार?
कलीम कुरेशी – गुटखा किंग म्हणून याची ओळख आहे. पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी मध्यंतरी ड्रग्स प्रकरणी एक गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये देखील याची गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
सय्यद मतीन – याच्यावर बलात्कारासह अन्य गुन्हे दाखल आहे. तसंच तडीपारीची कारवाई देखील प्रस्तावित आहे.
जफर बिल्डर- याच्यावर 500 ट्रक चोरून सुटे भाग करून विकणाऱ्या टोळीतला हा गुन्हेगार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मनपा वॉर्ड आरक्षण सुनावणीसाठी ठरणार तारीख
- #Budget2021 : ‘मोबाईल महाग करुन सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे ऑनलाईन शिक्षणाचे माध्यम महाग केले’
- धक्कादायक! औरंगाबादेत पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
- अण्णांच वय झालंय त्यांनी आता निवृत्ती घ्यावी; ‘या’ नेत्याने दिला अण्णा हजारेंना सल्ला
- ‘अर्थसंकल्प ना ऐकला ना वाचला, राहुल गांधींचे राजकारण अगदीच बालिश’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
