Share

‘पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ बारामतीला हलवण्याचा पवारांचा डाव’ ; शिवसेना नेत्याचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुरंदरचं विमानतळ बारामतीला हलवण्याचा कुठलाही निर्णय झाल्यास जिल्ह्यात मोठं आंदोलन उभं करु असा इशारा शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला आहे. शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पुण्यापासून जवळच पुरंदर येथे नवं विमानतळ स्थापन करण्याचा प्रस्ताव आता महाराष्ट्र सरकारनं मांडला आहे. पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा बदलून ते बारामतीच्या सीमेजवळ नेऊन ठेवणं हे मोठं षडयंत्र आहे.

विमानतळाची यापूर्वी पारगाव आणि सात गावांची जागा बदलून नव्यानं रिसे, पिसे, पांडेश्वर आदी गावातील म्हणजे पुरंदर तालुक्यातील जागा घ्यायची आणि विमानतळाचं प्रवेशद्वार बारामतीच्या बाजूला करुन तिकडचा विकास साधायचा. मग, विमानतळाच्या मागे पुरंदरमध्ये झोपडपट्टी होणार आणि सर्वांगिण विकासाची संधी जाणार. त्यामुळे हे षडयंत्र आपण जनतेला बरोबर घेऊन हाणून पाडण्यास सिद्ध आहोत, असा इशाराच शिवतारे यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळावरुन आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ बारामतीला हलवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केलाय. मात्र, कुठल्याही परिस्थितीत पुरंदरचं विमानतळ बारामतीला घेऊन जाऊ देणार नाही, असा इशारा विजय शिवतारे यांनी दिलाय. यामुळे आगामी काळामध्ये पुरंदर विमानतळामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!