Share

स्मार्ट सिटी बसचालकास रिक्षाचालकाची मारहाण

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : रस्त्याच्या मध्ये उभे केलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगताच संतप्त झालेल्या रिक्षाचालकाने प्रवासी घेऊन निघालेल्या स्मार्ट सिटी बस चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळी साडेसहा वाजता स्मार्ट सिटीचे बसचालक समाधान निवृत्ती वानखेडे यांनी मुकुंदवाडी बस डेपोतून बस (एमएच२०-३८६९ ) सिडको बस स्थानकाकडे वळवली. सिडको चौकात अज्ञात रिक्षाचालक मध्येच उभा होता. यावेळी बसचालकाने रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. रिक्षाचालकाने अरेरावीची भाषा वापरत, शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावर शांततेत बोलत बसचालकाने रिक्षा बाजूला घेण्याची विनंती केली. यावेळी सदर रिक्षाचालकाने बसमध्ये चढत स्टेअरिंगवर बसलेल्या बसचालक वानखेडेंना मारहाण करण्यास सुरुवात केली.

यामध्ये स्मार्ट सिटी बसचालक समाधान निवृत्ती वानखेडे जबर जखमी झाले आहेत. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर रिक्षाचालकाला वाचवण्यासाठी काही रिक्षाचालकांनी सकाळी बसस्थानकात गोंधळ घातल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या 

एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय- शरद पवार

‘आरसीबी’तून आऊट ‘सीएसके’त इन? उमेश यादवच्या ‘या’ कृतीने चर्चेला उधाण

राममंदिर निधीसाठी घरोघरी फिरलेच पाहिजे-आमदार सावे यांचा इच्छुक उमेदवारांना सल्ला

रामभक्तांना भिकारी म्हणता, शिवसेनेने तातडीने माफी मागावी; राम कदम आक्रमक

‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांना संपवले’ साक्षी महाराजांचे कॉंग्रेसवर गंभीर आरोप !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!