Share

पंकजा मुंडेंची ओबीसी जनगणनेची मागणी; गोपीनाथ मुंडेंचा जुना व्हिडीओ ट्वीट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- जातिनिहाय जनगणनेबाबत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्याचा विधानामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०२१ ची जनगणना जातिनिहाय व्हावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.

पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय मुद्द्यांनाही हात घालायला सुरुवात केली आहे. पंकजा यांनी आता थेट ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी भाजपचे नेते, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ ट्विट करून मोदी सरकारलाच ओबीसींना दिलेल्या ‘कुछ वादेंची’ आठवण करून दिली आहे.

आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आमचीही गणना करा. ओबीसींची जनगणना आवश्यक आहे आणि गरजही आहे. कुछ यादे और कुछ वादे, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी हिंदीत हे ट्विट केलं आहे. पंकजा यांनी पोस्टसोबत एक व्हिडीओही अपलोड केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे लोकसभेतील गोपीनाथ मुंडे यांचं 18 मिनिटाचं भाषण आहे. त्यात त्यांनी लोकसभेतील उपनेते म्हणून ओबीसी जनगणनेची मागणी केली होती. त्यानंतर भाजपची सत्ता आली पण अजूनही ओबीसींची जनगणना झाली नाही. आज खुद्द पंकजा मुंडेंनी हिंदीत ट्विट करत थेट दिल्लीला ओबीसींच्या जनगननेची आठवून करून दिलीय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!