मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज विविध पद्धतीने आक्रोश व्यक्त करत आहे. आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सरकारने सर्व प्रकारच्या भरत्या थांबवाव्यात अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. तर, २०२० मधील जाहिरातींनुसार होणाऱ्या एमपीएससी परीक्षांना देखील मराठा समाजाने विरोध केला होता.
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आंदोलन सुरू केलं आहे. भाजप देखील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थ्यांची आझाद मैदानावर जाऊन भेट घेतली.
‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जी मदत लागेल ती द्यायला आम्ही तयार आहोत. पण तोपर्यंत सरकारने एक अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा तरुणांना दिलासा दिला पाहिजे. सरकार जर अध्यादेशाचा निर्णय घेणार नसेल तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावं लागेल,’ असा आक्रमक इशारा देखील प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.
शासनाच्या विविध आस्थापनात नियुक्ती झाली,पण नेमणूक मिळाली नाही.मराठा समाजातील अशा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, SEBC चं आरक्षण लागू करावं यासाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत.आज आझाद मैदान येथे भेट देऊन ह्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. pic.twitter.com/a1f4iBeGfY
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 24, 2021
महत्वाच्या बातम्या
- एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय- शरद पवार
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळकेंनी राम मंदिर निर्माणासाठी दिला तब्बल ‘इतका’ निधी !
- राममंदिर निधीसाठी घरोघरी फिरलेच पाहिजे-आमदार सावे यांचा इच्छुक उमेदवारांना सल्ला
- यंदा लाल रंगाच्या कपड्यातील अर्थसंकल्पाची परंपरा मोडणार !
- ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांना संपवले’ साक्षी महाराजांचे कॉंग्रेसवर गंभीर आरोप !


