Share

तजेलदार त्वचेसाठी करा ‘हे’ उपाय

Published On: 

🕒 1 min read

पुणे : सुंदर आणि नितळ त्वचा हवी असल्यास स्किन केअर रुटीन नियमित फॉलो करणं आवश्यक आहे. पण बहुतांश लोकांना त्वचेवर नेहमी-नेहमी क्रीम आणि लोशनचा उपयोग करणं कंटाळवाणं काम वाटतं. सुरुवातीचे काही दिवस त्वचेसाठी न चुकता सर्व उपाय केले जातात, पण नंतर-नंतर स्किन केअर रुटीन फॉलो करण्याचा कंटाळा येऊ लागतो. पण डागविरहित, सुंदर त्वचा हवी असल्यास कंटाळा करून कसं चालेल? त्वचा रूक्ष व कोरडी होऊ नये, यासाठी मॉइश्चराइझरचा नियमित उपयोग करणं गरजेचं आहे. विशेषतः हिवाळ्यामध्ये त्वचेवर वारंवार मॉइश्चराइझर लावण्याची आवश्यकता भासते.

हा उपाय आहे अतिशय सोपा

1.वारंवार क्रीम आणि लोशनचा वापर करण्याच्या त्रासातून मुक्तता हवी असल्यास तुम्हाला स्वंयपाकघरातील दोन सामग्रींची मदत घ्यावी लागेल. केशर आणि मध साधारणतः प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये सहजरित्या आढळते. केशर आणि मधाचे फेस पॅक लावल्यास चेहऱ्यावर खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो.

2.हे मिश्रण तयार करण्यासाठी वाटीमध्ये एक चमचा मध आणि किचिंतसे केशर एकत्र घ्या. दोन्ही सामग्री नीट मिक्स करा. पाच ते सात मिनिटांसाठी मिश्रण वाटीमध्ये राहू द्यावे. जेणेकरून केशर मधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल.

असा करा फेस पॅकचा वापर

1.फेस पॅक तयार केल्यानंतर चेहरा आणि मानेवर लावा. कमीत कमी २० मिनिटांसाठी पॅक लावून ठेवा. पॅक लावून विश्रांती करावी. अन्य कोणतेही काम करू नका. यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेलाही आराम मिळतो.

​2.थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या २० मिनिटांनंतर थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. कॉटनच्या मऊ कापडाने चेहरा पुसावा. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर फेस वॉशचा उपयोग करू नये.

3.याऐवजी आपण चेहऱ्यावर गुलाब पाणी लावू शकता. यामुळे त्वचेचं टोनिंग होईल आणि त्वचेला पोषण तत्त्वांचा पुरवठा देखील होण्यास मदत मिळेल.

NOTE त्वचेशी संबंधित समस्यांवर कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच दुसऱ्या व्यक्तीचे स्किन केअर रुटीन फॉलो करण्याची चूक करू नये. कारण प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगळा असतो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!