नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील तर 1 फेब्रुवारीला बजेट सादर केले जाणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. अधिवेशनाच्या दुसर्या भागात अर्थसंकल्पाच्या प्रस्तावांवर चर्चा होईल. यापूर्वी सरकारने कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावले नव्हते. CCPA ने म्हटले की, अधिवेशन काळात कोरोना विषाणूशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल.
या पार्श्वभूमीवर यंदा देशाच्या इतिहासात पहिल्यांदच पेपरलेस बजेट सादर होणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाची प्रिंट छापण्यात येणार नाही. दरवर्षी अर्थसंकल्पाच्या प्रती सर्व खासदार, माध्यमे यांना दिल्या जातात. हि परंपरा यावर्षी खंडित होणार आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पा आधी केले जाणारे सर्वेक्षण देखील छापले जाणार नाही. तर सर्व अर्थसंकल्प हा डीजीटल सोफ्ट कॉपी मध्ये सादर केला जाणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडियाला प्रोत्साहत देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी आर्थिक बजेट लाल रंगांच्या कपड्यात सादर न होता ऍपच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केंद्रीय बजेट ऍप लाँच केलं आहे. ज्यामध्ये बजेट संदर्भात सर्व माहिती नागरिकांना मिळणार आहे.युनियन बजेट ऍपद्वारे स्मार्ट फोन यूजर्स हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांमध्ये बजेट वाचू शकतात. सामान्य जनतेपर्यंत सर्व माहिती पोहचू शकेल हाच या मागचा उद्देश आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ऍपच्या माध्यमातून बजेट सादर होणार आहे.

ऍप एंड्रॉयड आणि iOS या दोन्ही मोबाईलवर उपलब्ध असणार आहे. हे मोबाईल ऍप आर्थिक माहिती विभाग (डीईए) च्या नेतृत्वात नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) तयार केले आहे. आर्थिक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ऍपला यूजर फ्रेंडली इंटरफेस असेल. यामध्ये 14 वेगळ्या केद्रींय बजेटच्या कागदपत्रांचा एक्सेस यूजर्सला मिळणार आहे. त्यामध्ये फायनेंशियल स्टेटमेंट, डिमांड फॉर ग्रांट्स (DG) आणि फायनेंस बिल (Finance Bill) देखील असणार आहे. हे सर्व कागदपत्र यूजर्सला डाउनलोड देखील करता येणार आहे.
यावेळी कोरोना काळात अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांबरोबरच उद्योजकांना देखील दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तर गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेची होत असलेली पडझड लक्षात घेता यंदाचा अर्थसंकल्प यावर काय उपाययोजना आणणारा ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय- शरद पवार
- ‘आरसीबी’तून आऊट ‘सीएसके’त इन? उमेश यादवच्या ‘या’ कृतीने चर्चेला उधाण
- राममंदिर निधीसाठी घरोघरी फिरलेच पाहिजे-आमदार सावे यांचा इच्छुक उमेदवारांना सल्ला
- रामभक्तांना भिकारी म्हणता, शिवसेनेने तातडीने माफी मागावी; राम कदम आक्रमक
- ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांना संपवले’ साक्षी महाराजांचे कॉंग्रेसवर गंभीर आरोप !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

