औरंगाबाद : नुकतीच भाजपच्या ओबीसी मोर्चाची कार्यकारणी जाहीर झाली. या कार्यकारिणीचे नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम संत गाडगेबाबा उद्यानात पार पडला. याप्रसंगी बोलताना बापू घडामोडे कार्यकर्त्यांना म्हणाले की, ओबीसी भाजपपासून वेगळा नाही, ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी भाजप विरोधात बंड करू पण घरच्या घरात, असे म्हणत उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांच्या कपाळावर बापू घडामोडे यांनी आठ्या आणल्या. यावेळी खासदार भागवत कराड, आ. अतुल सावे, भाजप सचिव विजया रहाटकर, शहराध्यक्ष संजय केनेकर, महिला मोर्चाच्या माधुरी अदवंत, अमृता पालोदकर, मनीषा भन्साली यांची उपस्थिती होती.
मंडळ कार्यकारणी नियुक्ती प्रदान सोहळ्यात घडामोडे म्हणाले, राजकारण दुधासारखे आहे. दुधाला जसे चांगले विरजण घालून दही, लोणी, तूप तयार होते. तसे कार्यकर्त्यांनी कार्याचे चांगले विरजण घातले पाहिजे म्हणजे नेहमी चांगले तूप मिळेल अशी आशा असते. भाजप पक्षाने ओबीसी समाजासाठी खूप केले, पुढे ही करणार पण काही गोष्टींसाठी जर अडचणी आल्या तर भाजपच्या विरोधात बंड करू पण तेही घराच्या आत. मनपा निवडणूक भाजप मोठ्या प्रमाणात जिंकणार असल्याचेही त्यांनी ठाम विश्वास कार्यकर्त्यांना दिला.
महत्वाच्या बातम्या
- रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा; चित्रा वाघ यांची मुंबई पोलिसांकडे मागणी
- ‘अकोल्याच्या मोर्णा नदीप्रमाणेच औरंगाबादच्या खाम नदीला मिळणार जीवनदान
-
उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती, तुमच्यासारखे भिकारी नाही; अब्दुल सत्तारांची भाजपवर टीका
- बायोमेट्रिक हजेरीमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले
- “भारतीय खेळाडूंसमोर तुम्ही प्राथमिक शाळेतले”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
