नांदेड : दिव्यांगांचे प्रश्न आव्हानात्मक जरी असले तरी त्याच्यांत तसूभरही आत्मविश्वासाची कमतरता नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या मागण्या, अपेक्षा असतील तर शासनाने प्राधान्याने पूर्ण केल्या पाहिजे, असे ते म्हणाले. कौठा ओम गार्डन येथे दिव्यांग व वरिष्ठ नागरिकांसाठी मोफत सहाय्यक उपकरण वितरण समारंभात ते बोलत होते.
सामजिक न्याय व अधिकारिता विभागाच्यावतीने एडिप व राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत या उपरणांचे वाटप करण्यात आले होते. या समारंभात केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारीता मंत्री थावरचंद गेहलोत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मुख्य अतिथी म्हणूण उपस्थिती लावली होती. जिल्हास्तरावर न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय भवनही उभारले आहे. या भवनात दिव्यांगांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करू. त्या कक्षात त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकिय योजनांचा लाभ घेता येईल, असे आश्वासन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.
या भवनासाठी केंद्र सरकारने राज्य शासनाला सोबत घेऊन पुढाकार घ्यावा अशी विनंती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गोहलोत यांना केली. दिव्यांगाच्या विविध योजनांचे अतिशय चागंले काम महाराष्ट्र शासन करत आहे असा गौरव केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या भाषणात केला
महत्वाच्या बातम्या
- पवारांचा दुटप्पीपणा, एकीकडे कृषी कायद्यांना विरोध तर दुसरीकडे गात आहेत करार शेतीचे गोडवे
- ‘बाळासाहेबांचा पुतळा पाहिल्यानंतर वाटतं की ते उद्धव यांना सांगतायत, त्यांनी चुकीचा निर्णय घेतला’
- ‘सत्तेत येऊनही महाविकास आघाडी संभाजी भिडेंवर कारवाई का करत नाही ?’
- गोपीनाथ मुंडें नंतर ओबीसी समाजाची धुरा आता भुजबळ साहेबांकडे : वडेट्टीवार
- गंभीर ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सहीनंतर मंत्रालयातील ‘त्या’ फायलीचा शेराच बदलला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
