🕒 1 min read
मुंबई : भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी जगातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याला भारतातच नाही जर तो जिथे जाईल तिथे त्याचे चाहते भेटतात. अगदी तो निवृत्त झाल्यानंतरही त्याची लोकप्रियता कमी झालेली दिसत नाही. यातच आता धोनीच्या चाहत्याचा एक व्हडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मधील धोनीची चाहती हि एक वयस्कर महिला आहे. तिने धोनीला दिलेला एक सल्ला सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
धोनीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की तो एका वयस्कर महिलेशी गप्पा मारत आहे. तिच्या आजूबाजूला काही लोक आहेत. ती महिला धोनीशी अगदी साधेपणाने गप्पा मारत आहे. तिच्या कुटुंबाविषयी माहिती देत आहे. तसेच तिने धोनीला मनभरुन आशिर्वादही दिले.
सध्या अशी चर्चा आहे की धोनी एका जाहिरातीनिमित्त मुंबईत आहे. याच दरम्यानचा ही आजी त्याला भेटायला आल्याचा कयास लावला जात आहे. तरी हा व्हिडिओ नक्की कधीचा आहे, याबाबत पूर्ण स्पष्टता नाही.
या व्हिडिओमध्ये दिसले की ही आजी धोनीला सांगते की तिच्याकडे अनेक दुकाने आहेत. तिला ५ मुले असून ती आता तिच्या नातवंडांमध्ये वेळ घालवते. यावर धोनी तिला म्हणतो, हीच वेळ चांगली असते आपल्या नातवंडांमध्ये वेळ घालवण्याची कारण मुले मोठी होत असताना असा वेळ मिळत नाही.
याबरोबरच आजीने धोनीला किती मुले आहेत, असे विचारले, त्यावर धोनीने त्याला एक मुलगी असल्याचे सांगितले. पुढे ती महिला धोनीला म्हणाली, जर तुला मुलगा झाला तर त्याचं नाव तू रोशन ठेव. तो तुझं नाव मोठं करेल. तसेच या आजीने धोनीला आशिर्वाद दिले.
https://www.instagram.com/p/CKVw_btJKxI/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- स्मार्ट सिटी बसचालकास रिक्षाचालकाची मारहाण
- यंदा लाल रंगाच्या कपड्यातील अर्थसंकल्पाची परंपरा मोडणार !
- पंकजा मुंडेंची ओबीसी जनगणनेची मागणी; गोपीनाथ मुंडेंचा जुना व्हिडीओ ट्वीट
- तजेलदार त्वचेसाठी करा ‘हे’ उपाय
- …अन्यथा मराठा विद्यार्थ्यांसोबत विरोधी पक्षनेते उपोषणाला बसणार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
