🕒 1 min read
नवी दिल्ली: ‘चलो बुलावा आया है’ हे भजन माहित नसेल असे कोणी नसेल आज मात्र या भजनाचे गायक प्रसिद्ध भजन गाणारे भजन सम्राट नरेंद्र चंचल याचं निधन झाल्याची दुखद बातमी आली आहे. नरेंद्र चंचल हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते.
गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्यावर दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. चंचल यांना लहानपणापासून भजन गाण्याची आवड होती. मातारानीची भजन ते लहानपणापासून गात असायचे.
‘बॉबी’मधील ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ या आणि ‘आशा’ सिनेमातील ‘चलो बुलावा आया है, माताने बुलाया है’ या भजनांमुळे घराघरात पोहोचलेले चलो बुलावा आया है माताने बुलाया है… या भजनामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या भजनामुळे ते घराघरात पोहोचले. तर ‘बॉबी’मधील ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ हे गाणंही त्यांचं प्रसिद्ध झालं. आजही त्यांची गाणी लोकांच्या ओठांवर आहेत. त्यानंतर त्यांनी हिंदी, पंजाबी सिनेमात अनेक गाणी गायली.
प्रसिद्ध भजन गायक श्री नरेन्द्र चंचल जी का निधन।। मां भवानी उनको चरणों में स्थान दे। pic.twitter.com/Ac996HDcZE
— Ganesh3000 ..हिंदूराष्ट्र..जय भवानी.. जय शिवाजी (@Ganeshshe123) January 22, 2021
प्रसिद्ध भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते 80 वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे संगीतक्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मार्च 2020मध्ये नरेंद्र चंचल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते दुर्गामातेचं भजन गाताना दिसले होते. या व्हिडीओत ते कोरोनावरील गाणं गाताना दिसले होते. ‘डेंगू भी आया और स्वाईन फ्लू भी आया, चिकन गोनिया ने शोर मचाया, कित्थे आया कोरोना?…’ हे गाणं गाताना ते व्हिडीओत दिसले होते.
महत्वाच्या बातम्या
- गेल्यावर्षी यूपीएससी परीक्षांमध्ये शेवटचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव संधी नाहीच !
- वाई न्यायालयाकडून उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा
- मराठा आरक्षणासाठी मंत्र्यांच्या जिल्ह्यात घेणार मेळावे-आ.विनायक मेटे
- तुमच्या ट्विटर अकाऊंट मध्ये होणार ‘हा’ बदल…
- पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : चारचाकीतून प्रवास करताना आता मास्कची गरज नाही ! मात्र…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
