मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व केल्यानंतर गंभीरने राजकीय क्षेत्राच्या खेळपट्टीवर नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. त्या अनुशंगाने २०१९ साली त्याने भारतीय जनता पार्टीत (भाजपा) प्रवेश घेतला आणि पूर्व दिल्लीकडून लोकसभेची निवडणूक लढवली. तो आता पूर्व दिल्लीचा खासदार आहे.
कित्येक भारतीय क्रिकेटपटू क्रिकेटव्यतिरिक्त सामाजिक कार्य प्राधान्य देतात. यात भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरचे नाव बऱ्याचदा आघाडीवर असते. आता नुकतेच त्याने आयोध्येत राम मंदीर उभारणीसाठी मोठी देणगी दिली आहे. गंभीर हा पूर्व दिल्लीचा खासदार आहे.
आयोध्येत राम मंदीर उभारण्यासाठी निधी गोळा करण्याचे अभियान सुरू झाल्यानंतर गंभीरने या कार्यासाठी १ कोटी रुपयांची देणगी दिली असल्याचे समजत आहे. निधी गोळा करण्याचे अभियान १४ जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली. त्यांनी सर्वात आधी यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी अयोध्येत भव्य मंदिर बांधण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडे 5 लाख 100 रुपयांचा धनादेश सोपवला आहे.
त्यानंतर बॉलीवुड स्टार अक्षय कुमार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अशा अनेक मोठ्या सेलिब्रेटींनी देणगी दिली आहे. यात आता गौतम गंभीरचे नावही जोडले गेले आहे. गंभीर याबाबत म्हणाला, ‘राम मंदीराची भव्य उभारणी सर्व भारतीयांचे स्वप्न आहे. त्यासाठी माझी आणि माझ्या परिवाराकडून हे छोटेसे योगदान आहे.’
महत्वाच्या बातम्या
- ‘…म्हणून माझ्या मनात मोहम्मद सिराज बद्दल खूप सन्मान आहे’
- मराठा आरक्षणासाठी आगळेवेगळे आंदोलन
- नागपुरमध्ये शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; नाराज शिवसैनिकांचे पक्षप्रमुखांना पत्र
- ‘धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या पक्षात काम करू करा’, रोहित पवारांचा सल्ला
- …आता तरी राणेंना सुखाने झोप लागेल; पवारांचा राणेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
