Share

गेल्यावर्षी यूपीएससी परीक्षांमध्ये शेवटचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव संधी नाहीच !

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या वर्षीच्या सुरुवातीलाच कोरोनाने हाहाकार माजवला होता. यामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला होता. अचानक टाळेबंदी करण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना गावी जावं लागलं. त्यामुळे त्यांना पुरेशी तयारी करताना समस्यांना सामोरे जावे लागले, याचा विचार करता गेल्या वर्षी शेवटची संधी असलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव संधी मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती.

त्यावर केंद्र सरकारने न्यायालयाला स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांना अजून एक संधी मिळणार नाही. केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की केंद्र सरकारचा अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यास नकार आहे. आता या प्रकरणावर अंतिम सुनावणी 25 जानेवारीला घेण्यात येणार आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात युपीएससीची पूर्व परीक्षा झाली होती. यानंतर विद्यार्थ्यांना वाढीव संधी मिळावी यासाठी याचिका करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने यावर विचार करावा असे निर्देश दिले होते. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांवर विचार केला जात असल्याचे सांगितले होते. मात्र, सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपले मत मांडले असून अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यास नकार दिला आहे.

यूपीएससीमध्ये संधीच्या मर्यादा –

युपीएससीच्या नियमांनुसार साधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सहा प्रयत्न देता येतात तर त्यांना वयाची मर्यादा ही 32 इतकी आहे. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा नऊ प्रयत्न आणि 35 वर्षे इतकी आहे. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वयाच्या 37 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रयत्नांची कोणतीही मर्यादा नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!