🕒 1 min read
जालना : मराठा आरक्षणाची मागील अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. मात्र, अजूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. याच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंबड तालुक्यातील साष्टी पिंपळगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावात ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनाची सुरुवात गावातून बैलगाडी, ट्रॅक्टर, दुचाकी, लेझीम पथक, भजनी मंडळी, महिला, पुरुष व लहान मुलं-मुलींची रॅली काढून करण्यात आली. मराठा आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधवांकडून मुक मोर्चासह ठोक मोर्चे ही काढण्यात आले. त्यानंतर राज्य शासनाने मराठा आरक्षण जाहीर केले. मात्र, मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. अशात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील साष्टीपिंपळगाव येथे मराठा समाज बाधवांच्या वतीने राज्यव्यापी ठिय्या आंदोलन केले गेले.
या रॅलीत २५ बैलगाड्या, २४ ट्रॅक्टर, वीस दुचाकी, लेझीम पथकाचा समावेश होता. या रॅलीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता. महिला, मुली, पुरुष, तरुण या रॅली मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी संपूर्ण गावात एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं आशा विविध घोषणांनी दुमदुमून निघाले होते. या रॅली दरम्यान पोलिस बंदोबस्त ही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
- भाजपवाले भविष्यात देशाचा हिंदुस्थान ऐवजी कमलास्थान असा उल्लेख करतील; राष्ट्रवादीची टीका
- लातूर मनपाकडून व्याजावर 100 टक्के सुट
- ग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची मुसंडी
- शहरांची नावं बदलता बदलता भाजपच्या मुख्यमंत्र्यांने चक्क फळाचे देखील नाव बदलले
- मोहम्मद सिराजचे धमाकेदार प्रदर्शन अन् ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचे ‘थोबाड’ कायमचे बंद !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
