Share

लातूर मनपाकडून व्याजावर 100 टक्के सुट

Published On: 

लातूर : लातूर मनपा हद्दीत एकूण 179 कोटींची थकबाकी असल्याने मनपा तिजोरीत ठणठणाट आहे. यावर उपाययोजना म्हणुन कर वसुलीसाठी अभय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एकरकमी भरणा केला तर व्याजदरात शंभर टक्के सुट दिली जाणार आहे, असे मनपा आयुक्त देविदास टेकाळे यांनी सांगितले.

एकूण 179 कोटी थकबाकींपैकी मालमत्ताधारकांकडे 109 कोटी तर नळधारकांकडे 70 कोटी आहे. लातूर शहरात एकूण 93 हजार मालमत्ताधारक आहेत. काही मालमत्ताधारकांनी दोन वर्षांपासून मालमत्ता कर भरलेला नाही. त्यांनी एकरकमी कर भरला तर व्याजामध्ये सुट मिळणार आहे. 56 हजार नळधारक सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच कर वसुलीत वाढ व्हावी म्हणुन मनपा आयुक्तांनी शास्ती रकमेवरील काही प्रमाणात सुट देण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे असे सहायक आयुक्त सुंदर बोंदर सांगितले. कर भरण्यासाठी शहरातील चारही झोनमध्ये सोय करण्यात आली आहे. मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!