🕒 1 min read
गांधीनगर : महाराष्ट्रात औरंगाबादचं नामांतर करण्याची मागणी जोर धरत आहे. शिवसेना-भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आरोपप्रत्यारोप होत आहेत. मात्र भाजपाचं सरकार असलेल्या गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी घेतलेला एक निर्णय चांगलाच चर्चेत आला आहे.
शहरांची नावे बदलण्याचा सपाटा लावलेल्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी चीन बरोबर संघर्ष सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर ड्रॅगन फ्रुट म्हणून प्रसिद्ध असलेल्या फळाचं नाव बदलले आहे. गुजरातमध्ये आता हे फळ कमलम (कमळ) या नावानं ओळखलं जाणार आहे.
“फळाला ड्रँगन शब्द वापरणं चांगलं नाही. ड्रॅगन हे फळ कमळासारखं दिसत. त्यामुळे या फळाला नावं संस्कृत शब्दानुसार कमलम हे देण्यात आलं आहे, असं सांगण मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रूटच्या नव्या नावाची घोषणा केली.
कोणत्याही फळाला ड्रॅगन हा शब्द वापरणं योग्य नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे या फळाचं नाव कमलम करण्यात आलं आहे. लाल आणि गुलाबी रंगाच्या या फळाचं नवं नामकरण गुजरात पुरतंच मर्यादित असणार आहे.
दरम्यान,गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. ड्रॅगन हे चीनचे प्रतिक आहे. चीनशी ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे गुजरात सरकारने हा निर्णय घेतला असावा का, अशी चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील महिला व वकील संघटनांनी दिल्या शक्ती कायद्यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना
- पायाच्या शस्त्रक्रियेसाठी कमल हसन रुग्णालयात दाखल; श्रुती हसनची ट्विटव्दारे माहिती
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- ‘शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा’
- वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करा : आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
