🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात औरंगाबादचं नामांतर करण्याची मागणी जोर धरत आहे. शिवसेना-भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आरोपप्रत्यारोप होत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला भाजपाचं सरकार असलेल्या गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी घेतलेला एक निर्णय चांगलाच चर्चेत आला आहे.
शहरांची नावे बदलण्याचा सपाटा लावलेल्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी चीन बरोबर संघर्ष सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर ड्रॅगन फ्रुट म्हणून प्रसिद्ध असलेल्या फळाचं नाव बदलले आहे. गुजरातमध्ये आता हे फळ कमलम (कमळ) या नावानं ओळखलं जाणार आहे.
“फळाला ड्रँगन शब्द वापरणं चांगलं नाही. ड्रॅगन हे फळ कमळासारखं दिसत. त्यामुळे या फळाला नावं संस्कृत शब्दानुसार कमलम हे देण्यात आलं आहे, असं सांगण मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रूटच्या नव्या नावाची घोषणा केली.
कोणत्याही फळाला ड्रॅगन हा शब्द वापरणं योग्य नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे या फळाचं नाव कमलम करण्यात आलं आहे. लाल आणि गुलाबी रंगाच्या या फळाचं नवं नामकरण गुजरात पुरतंच मर्यादित असणार आहे.
दरम्यान, या निर्णयाची खिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी उडवली आहे.ड्रॅगन फ्रुट या फळाचं गुजरात सरकाराने नाव बदलून कमलम असं नाव दिलेले आहे. आता भारतीय जनता पार्टीने स्वतःची ब्रँडिंग ही फळांवर सुद्धा करण्यास सुरुवात केलेली दिसते. भविष्यात हिंदुस्थान ऐवजी कमलास्थान असा उल्लेख करतील कि काय अशी शंका मनामध्ये निर्माण होते असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- शहरांची नावं बदलता बदलता भाजपच्या मुख्यमंत्र्यांने चक्क फळाचे देखील नाव बदलले
- पायाच्या शस्त्रक्रियेसाठी कमल हसन रुग्णालयात दाखल; श्रुती हसनची ट्विटव्दारे माहिती
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- ‘शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा’
- वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करा : आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
