मुंबई : राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल संमिश्र लागले आहेत. राज्यातले प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांनी आपापल्या क्षेत्रांवर पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका या राजकीय पक्षाच्या अधिकृत चिन्हावर होत नसल्यामुळे, सर्वच राजकीय पक्षाचे नेते निवडून आलेल्या उमेदवारांना ‘आपले’ म्हणत आहेत. त्यामुळे सरपंच निवडणुकीनंतरच ग्रामपंचायत निवडणुकीतले पक्षीय बलाबल स्पष्ट होणार आहे.
राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चमकदार कामगिरी केली असून 4 हजार पेक्षा अधिक सदस्य रिपाइं चे निवडून आले आहेत. राज्यात भजप आणि आरपीआयला ग्राम पंचायत निवडणुकीत बहुमत लाभले असून राज्यात भाजपवरच जनमानसांचा विश्वास असल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे असा दावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केला.
निवडून आलेल्या ग्राम पंचायत सदस्यांनी निवडणुकीत झालेले वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. ग्रामीण भागात रिपब्लिकन पक्षाची जनतेशी नाळ घट्ट आहे.
अनेक ठिकाणी स्वबळावर तर राज्यभरात बहुतांश ठिकाणी भाजपशी युती करून रिपाइंने ग्राम पंचायत निवडणूक लढविली आहे. त्यात रिपाइं चे 4 हजार हुन अधिक निवडून आल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठा निर्णय : महाराष्ट्र विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार…
- कृषी कायद्यांच्या विरोधात ८० वर्षांचा योद्धा उतरणार मैदानात
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- मुलींच्या जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षणाच्या अनुदानात वाढ
- भाजपाचे ग्रामीण भागातील वर्चस्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून पुन्हा सिध्द झाले : पाठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
