🕒 1 min read
नवी दिल्ली:- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मुंबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाने विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त केला. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासंदर्भात आज 20 जानेवारी रोजी महत्वाची सुनावणी होणार होती.
दरम्यान आज होणारी सुनावणी पुढे ढकली असून आता पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आज होणारी सुनावणी पुढे ढकल्यामुळे राज्यातील मराठा समाजासह अनेक राजकीय नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणावर बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारची आणि वकिलांची 11 तारखेला दिल्लीत बैठक झाली होती. त्या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणही उपस्थित होते. राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला पाहिजे, यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य अपेक्षित आहे, असे चव्हाण म्हणाले होते. दरम्यान, आज होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठा निर्णय : महाराष्ट्र विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार…
- परतफेडीची मागणी करत ‘डीएचएफएल’ च्या ठेवीदारांचा पिरामल समूहाच्या प्रस्तावाला विरोध !
- ‘चिन्यांच्या घुसखोरीबाबत मिठाची गुळणी धरून बसणार नाहीत, अशी जनतेला अपेक्षा’
- मुलींच्या जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षणाच्या अनुदानात वाढ
- राज्यात आतापर्यंत १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
