Share

औरंगाबाद शहरात ‘ती’ सुरक्षित आहे का?

Published On: 

औरंगाबाद : जनजागृती, कायद्याचा धाक दाखवूनही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. औरंगाबाद शहरात रेल्वेस्थानक भागात परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रकरण नुकतेच समोर आलेय. तर घाटीत आत्महत्येचा प्रयत्न फसलेल्या महिलेवर तिच्याच पतीने ब्लेडने वार केल्याची घटना रविवारी घडलीये. यात तिचा चेहरा विद्रुप तर झालाच सोबतच 18 टाके पडले आहेत. रस्त्यावर, घरी हिंसाचार होणे हे प्रकार आता नित्याचेच झालेत. मात्र आता शासकीय रुग्णालयातही हिंसाचार होत असल्याने अधिक चिंतेचा विषय बनला आहे.

महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. संविधानात केलेल्या कायद्यांनुसार अत्याचार, मारहाण प्रकरणांमध्ये महिलांना न्याय मिळू शकतो. मात्र या कायद्यांची अंमलबजावणी होतांना मध्ये अनेक प्रकारचे अडथळे येतात. पंच, साक्षीदार फितूर होतात. अनेक वेळा सेटलमेंटच्या नावाखाली प्रकरण दाबले जातात. नवीन शक्ती कायद्याची अंमलबजावणी तरी व्यवस्थित व्हावी जेणेकरून महिला अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध बसेल, अशी अपेक्षा आहे.

अत्याचारांचे सत्र सुरूच
4 ऑगस्टला भांगसीमाता गडावर 20 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला होता. 1 ऑक्टोबरला घाटीतील महिला डॉक्टरवर चाकूहल्ला झाला होता. डिसेंबर महिन्यात नोकरीचे आमिष दाखवून शहरातील एका तरुणीवर वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या बाजूला एका कारमध्येच अत्याचार केल्याची अत्यंत गंभीर घटना ताजीच आहे. तसेच घरगुती मारहाण , पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या यांसारखे प्रकरण शहरात दररोजच पाहायला मिळतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!