Share

शिर्डी साई संस्थानच्या ‘त्या’ फलकाला भूमाता ब्रिगेडने फासलं काळं !

Published On: 

शिर्डी : साई मंदिरात प्रवेश करताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये, असे आवाहन साई संस्थानने केलेले आहे. साई मंदिर परिसरात तशा आशयाचे फलकही लावण्यात आलेले आहेत. साई संस्थानच्या याच आवाहनावर आक्षेप घेत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आक्रमक झाल्या होत्या.

महिन्याभरापूर्वी तृप्ती देसाई यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसोबत शिर्डीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. शिर्डीतील साई मंदिरात जाऊन तो फलक काढणार असल्याचा निर्धार त्यांनी केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना नगरच्या हद्दीबाहेरच रोखलं होतं. यानंतर त्यांनी संस्थानाला ३१ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला होता.

अशातच आज अचानक भूमाता ब्रिगेडच्या तीन कार्यकर्त्यांनी मंदिर आवारात जाऊन त्या फलकाची नासधूस केली आहे. उंचावर लावलेल्या या फलकाला या कार्यकर्त्यांनी काळं फासलं आहे. त्यामुळे शिर्डीमध्ये तणावपूर्ण वातावरण होत असून या तिन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.

तर याआधीच शिवसेनेसह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील साई संस्थानच्या निर्णयाला समर्थन दिलं होतं. तर, शिर्डीत येऊन काही स्टंटबाजी केली, तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा व ‘शिवसेना स्टाइल’ने उत्तर देण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!