Share

‘अजून कितीवेळा मराठा समाजाच्या भावनेला अशी नखं लावणार आहात?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला होता. यामुळे SEBC तुन अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या वर्गाच्याच अटी व नियम लागू होणार होते. यावर मराठा समाजातील विद्यार्थी, उमेदवारांसह नेत्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला होता.

हा सर्व विरोध लक्षात घेता राज्य सरकारने पोलीस भरतीचा जीआरच रद्द करण्याचं ठरवलं आहे. 4 जानेवारी रोजी गृह विभागाने काढलेल्या जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा उल्लेख होता. हा जीआर आता रद्द करण्यात आला असून शुध्दीपत्रक देखील काढण्यात येणार आहे.

त्यामुळे आधी जीआर मग घुमजाव या भूमिकेमुळे सरकार गंभीर नसून समाजा-समाजात तेढ निर्माण करतंय अशी टीका भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी केली आहे. ‘महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात नीटपणे बाजू मांडली नाही. आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बाजूला ठेवून प्रवेश प्रक्रिया केलीत. पोलीस भरतीमध्ये एसईबीसीच्या तरुणांचा विचार न करताच जीआर काढण्याची हिंम्मत केलीत…’ अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, ‘यावरुन सरकारची नियत आणि इरादे स्पष्ट होत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तरुणांना नोकऱ्या, शिक्षणात संधी मिळावी असे तिघाडी सरकारला वाटत नाही. का समाजा-समाजात तेढ निर्माण करताय? आता जीआर रद्द केला पण अजून कितीवेळा मराठा समाजाच्या भावनेला अशी नख लावणार आहात? असा सवाल शेलार यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!