🕒 1 min read
नवी दिल्ली: येत्या २९ जानेवारी पासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे तर १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सदर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पंततप्रधान नरेंद्र मोदींची उद्या ८ जानेवारीला प्रमुख अर्थशास्त्रज्ञांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीच आयोजन सरकार चा थिंक टैंक नीति आयोगाकडून करण्यात येणार असून नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार आणि सीईओ अमिताभ कांत यांचा सहभाग असेल यावेळी रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार अर्थव्यवस्थे चा आकार चालू आर्थिक वर्षात 7.5 टक्के घटू शकतो. तर आय एमएफच्या नुसार 10.3 इतकी ही घट असेल तर जागतिक बँकेनुसार 9.6 ही असेल. तर दुसऱ्या तिमाही दरम्यान GDP मध्ये ७.५% घट झाली होती.
भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चालू आर्थिक वर्षाची सप्टेंबर तिमाही दरम्यान अपेक्षेपेक्षा जलद भरपाई झाली होती. यामुळे ग्राहकांच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा असून या अर्थ संकल्पाकडून सर्वसामान्यांना देखील दिलासा मिळण्याची आशा आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या जोशी ‘सरां’ना नितीन गडकरींनी केला आदरपूर्वक वाकून नमस्कार
- CMO ट्विट : ‘संभाजीनगर’ उल्लेखावरून अजित पवारांना शंका; चौकशी होणार
- स्वदेशी Covaxin लसीच्या शेवटच्या ट्रायलबाबत महत्वाची बातमी !
- ‘भाजपला नामकरणावर बोलण्याचा आधिकार नाही, त्यांनी सत्तेत असताना काहीही केलं नाही’
- महाविकास आघाडी सरकार किती जणांचे आवाज दाबणर : राम कदम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
