Share

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे शूटिंग पुन्हा एकदा रद्द

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काश्मीर मध्ये पडणाऱ्या मुसळधार हिमवृष्टी तसेच विमानतळ बंदअसल्यामुळे ‘द काश्मीर फाइल्स’चे शूटिंग पुन्हा एकदा रद्द झाल्याचे दिसून येत आहे. तसेच जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि जेष्ठ अभिनेते अनुपम खेर या चित्रपटात दिसणार आहेत.

तसेच या आधी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना अन्नातून विष बाधा झाल्यामुळे आजारी होते आणि एका आठवड्यानंतर चित्रपटाचे निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांना पायाला गंभीर जखम झाल्यामुळे शुटींग रद्द केले होते तर आता काश्मीरमधील मुसळधार हिमवृष्टी आणि विमानतळ बंद असल्यामुळे ‘द काश्मीर फाइल्स’चे शूटिंग पुन्हा रद्द करण्यात आले.

विवेक रंजन अग्निहोत्री यांनी अलीकडेच मिडिया शी संवाद साधताना म्हणाले, ‘मला आश्चर्य वाटले की देहरादून आणि दिल्ली विमानतळावरील कर्मचारी आम्हाला खूप मदत करत होते . दिल्ली विमानतळावर त्यांनी संपूर्ण सामान जे लाखो रुपये किमतीचे होते ते त्यांनी त्यांचाकडून कॉम्प्लिमेंटरी म्हणून तसेच सोडले. त्यांनी आमच्यासाठी बसची देखील सोय केली होती. तीही एकदा न्हावे तर तीनदा. मग माझ्या लक्षात आले कि आम्ही सामाजिक कारणासाठी ‘द काश्मीर फाइल्स’ सारखा चित्रपट बनवित आहोत आणि प्रत्येक नागरिकाला वाटते कि हा चित्रपट लवकर बनला पाहिजे.’ पुनीत इस्सर महत्वाची भूमिका साकारत आहे, ‘द काश्मीर फाइल्स’ 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

तसेच द काश्मीर फाइल्स हा जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतर आणि त्यांच्या दुर्दशावर आधारित चित्रपट आहे आणि मिथुन चक्रवर्ती व्यतिरिक्त अनुपम खेर देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी विवेक ने लाल बहादूर शास्त्री कि रहस्यंमयी मृत्यू यावर आधारित ‘द ताश्कंद फाइल्स’ हा चित्रपट बनविला होता. आणि तो एक हिट चित्रपट ठरला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!