सोलापूर : ‘एमआयएम’च्या गढीला खिंडार पाडल्यानंतर आता सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेलाच धक्का दिला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने सोलापूर महानगरपालिकेतील शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनाच गळाला लावला आहे.
सुशीलकुमार शिंदे यांचे निष्ठावंत असलेल्या विष्णुपंत कोठे यांचे चिरंजीव असणारे महेश कोठे सध्या सोलापूर महानगरपालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते आहेत.ते आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत.
2014 मध्ये काँग्रेसला रामराम करत प्रणिती शिंदे यांच्याविरोधात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली आहे.2019 ला शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली.महेश कोठे यांना 21 नगरसेवकांपैकी शिवसेनेच्या 19 नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची माहिती महेश कोठे यांनी स्वत: ‘एबीपी माझा’ला दिली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला कायम आदर होता. तो पुढे देखील राहिल. पक्ष वाढवण्यासाठी मी मेहनत घेतली होती. विधानसभेच्या जागेवर माझा हक्क होता. मात्र मला संधी न देऊन डावलण्यात आलं. तेव्हापासून मी नाराज होतो असं ते म्हणाले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मी भेटण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र मधल्या काही लोकांनी भेट देखील होऊ दिली नाही. मी राष्ट्रवादीत जरी प्रयत्न करत असलो, तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहोत. अशी कोठे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ !
- आपल्या गायकीमुळे चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं रिलीज
- ‘मालकीण इटालियन असलेल्या थोरातांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली’
- ट्रम्प यांचे मित्र मोदी हे भारतीय लोकांचे विभाजन आणि राज्यघटना बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत : सिंह
- ग्रामीण भागातील रस्ते आता दर्जेदार होणार; केंद्र सरकारशी सामजंस्य करारास मान्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
