Share

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: इंडियन ऑईलच्या सांगण्यानुसार, पुन्हा वाढत्या इंधन भाव वाढीच ओझ ग्राहकंवर येताना दिसत आहे. तेल कंपन्यांनी गुरुवारी सलग दुसर्या दिवशी भाव वाढवले आहे. आज दिल्लीत पेट्रोल 23 पैशांनी वाढून 84.20 रुपये प्रति लीटर झाले. तर डिझेल 26 पैशांनी वाढून 74.38 रुपये प्रति लिटर झाले आहे.

त्याचप्रमाणे मुंबईत पेट्रोल 90 .86 तर डिझेल 81 .०7 रुपये इतके आहे, कोलकातामध्ये पेट्रोल 85.68 रुपये तर डिझेल 77.97 रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 86 .96रुपये आणि डिझेल79 .72 रुपये लिटर केले आहे. तसेच नोएडामध्ये पेट्रोल 84.०6 रुपये आणि डिझेल 74..8२ रुपये आणि लखनऊमध्ये पेट्रोल 83.98 रुपये तर डिझेल. 74.74रुपये प्रतिलिटर केले आहे.

तर कोविड -19 लसीबद्दल येणाऱ्या सकारात्मक बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा किमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडने 54 डॉलर प्रति बॅरल ओलांडला आहे. तथापि, भारतीय बास्केटच्या कच्च्या तेलाच्या किंमतीवर त्वरित परिणाम होत नाही आणि सुमारे 25 ते 30 दिवसांनंतर ते दिसून येते. परंतु तेल कंपन्यांनी किंमत वाढविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

29 दिवसानंतर काल प्रथमच पेट्रोल महाग झाले. विशेष म्हणजे मागील वर्षाच्या उत्तरार्धात पेट्रोलच्या किंमतीत बरीच वाढ झाली होती. त्यावेळी, ऑगस्टच्या दुसर्या पंधरवड्यापासून पेट्रोलचे दर वाढविण्याची प्रक्रिया सुरू झाली, ती 1 सप्टेंबरपर्यंत सुरू होती. यानंतर बर्याच वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी किंवा वाढतच गेल्या. परंतु 8 डिसेंबरपासून त्यात शांतता होती. बुधवारी 29 दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!