Share

‘…ही आनंदाची गोष्ट, शिवसेना आता बंगालमध्ये मोठा रेकॉर्ड करेल’

Published On: 

मुंबई : पश्चिम बंगाल मध्ये येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप मध्ये दररोज राजकीय वातावरण तापत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून निघालं आहे. रोड शो, सभा, लंच डिप्लोमसी आणि छोट्यामोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश आदी मार्गांनी भाजपने बंगालमध्ये कमळ उमलावे यासाठी रणनीती आखली आहे.

अशातच, बिहार निवडणुकांनंतर शिवसेना पश्चिम बंगालमध्ये देखील निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा पश्चिम बंगालचा दौरा करू शकतात. शिवसेना कोलकाता, हुगळी, दमदमसह अनेक भागांत आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते. तसेच निवडणूक लढण्याचा अंतिम निर्णय 29 जानेवारीला पक्षाच्या बैठकीत होणार आहे.

हे वृत्त वाऱ्याच्या वेगाने पसरलं. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला असता त्यांनी शिवसेनेला मिश्किल टोला लगावला आहे. ‘शिवसेना पश्चिम बंगालमध्ये लढणार ही आनंदाची गोष्ट आहे. कारण शिवसेनेनं एक रेकॉर्ड बिहारमध्ये तयार केलं आहे. नोटापेक्षा कमी मतं मिळवण्याचा बिहारमधील रेकॉर्ड आप (आम आदमी पक्ष) कडे होता. हा रेकॉर्ड शिवसेनेनं मोडला आहे. आता बंगालमध्ये ह्यापेक्षा मोठा रेकॉर्ड शिवसेना तयार करेल,’ अशी उपरोधिक टीका फडणवीसांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!