🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आलेली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मेहनती शास्त्रज्ञांचे आणि नवनिर्मिती करणाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. डीसीजीआयने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांना दिलेली मान्यता हे निर्णायक वळण असून कोविड विरुद्ध लढा मजबूत करणारे आहे असे मोदींनी म्हटले होते.
या लशींना परवानगी मिळाल्यानंतर नेमकं लसीकरण कधी सुरु होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तर, देशभरातील विविध राज्यांत सद्या ड्राय-रन देखील सुरु आहे. आता, केंद्र सरकारने कोरोना लसीकरण नेमकं कधी सुरु होणार हे जाहीर केलं आहे. देशातील कोरोना लसीकरण मोहिमेबाबत माहिती देण्यासाठी केंद्र सरकारनं पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लसीकरणाची तारीख सांगितली. 13 जानेवारीला कोरोना लशीचा पहिला डोस दिला जाणार आहे, लसीकरणाची मोहीम चालवण्यासाठी चार मोठी केंद्र आहेत. या लसीकरणासाठी लशींचा पुरवठा हवाई मार्गाने केला जाणार आहे. लशींची सध्याची उपलब्धता बघता केंद्र सरकारने ज्या गटांना अधिक धोका आहे, अशा गटांची प्राधान्याने लशीकरणासाठी निवड केली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस पुरवण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारीआणि फ्रंटलाईन वर्कर्सचा समावेश आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्ती तसेच 50 पेक्षा कमी वयाच्या परंतु अन्य गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. 3 कोटी लोकांना मोफत लस दिली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता ते भविष्यात मुस्लिमांचाही मेळावा घेतील, बिचाऱ्या शिवसेनेवर संगतीचा परिणाम; दानवेंचा टोला
- संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणाऱ्या थोरातांच्या घरी मनसे पाठवणार 10,000 पोस्टकार्ड
- ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढली; लक्ष्मी रतन शुक्ला यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
- सीरम विरुद्ध भारत बायोटेक : अखेर कोरोना लस उत्पादक कंपन्यांमधील वादावर पडदा
- संजय राऊत भाजपला सुरुंग लावण्याच्या तयारीत; राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
