Share

संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणाऱ्या थोरातांच्या घरी मनसे पाठवणार 10,000 पोस्टकार्ड

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर:- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.

औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील नामांतराला विरोध केला आहे. त्यामुळे, संभाजीनगर व्हावे अशी मागणी करणाऱ्या व राज्यासह औरंगाबाद महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची मात्र मोठी कोंडी झाली आहे.

दरम्यान, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नामांतर करायला कॉंग्रेसचा विरोध आहे, अशी भुमिका घेतली आहे. त्यावर जो छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करेल, त्यांना मनसे सोडणार नाही, असे नगरच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. औरंगाबादचे नाव बदलण्यास विरोध करणाऱ्या थोरात यांना मनसेच्या व जनतेच्या वतीने ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ असे लिहिलेले जिल्ह्यातून जवळपास दहा हजार पोस्टकार्ड बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरच्या पत्यावर पाठवले जाणार आहेत. मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी ही माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!