कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकांपुर्वीच तृणमूल काँग्रेसला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एका मंत्र्याने ममता दिदीला राजीनामा सुपुर्द केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूलमध्ये बडे नेते असणाऱ्या शुभेंदू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता माजी क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्ला यांनीही राजीनामा दिला आहे.लक्ष्मी रतन शुक्ला ममता सरकारमध्ये क्रिडा मंत्री होते, आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी ते तृणमुल काँग्रेसचे आमदार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रतन शुक्ला गेल्या काही दिवसांपासून राजीनामा देण्याच्या तयारीत होते. त्यांनी आज मंत्री पदाबरोबरच हावडा टीमसी जिल्हाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे. 2021 या वर्षी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक पार पडणार असून, त्याआधीच टीमसीला गळती लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शंकरराव गडाखांच्या प्रयत्नातून शनिशिंगणापूर ग्रामपंचायत 15 वर्षांनंतर बिनविरोध!
- तोडगा काढण्याच्या दिशेने दोन्ही बाजूनी पाऊल पुढे टाकण्याची आवश्यकता – कृषी मंत्री
- संजय राऊत भाजपला सुरुंग लावण्याच्या तयारीत; राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा
- कोरोनाचा कहर : ‘या’ देशात करण्यात आली संपूर्ण लॉकडाउनची घोषणा
- टीम इंडिया सोबत डिनर : ऑस्ट्रेलियात चाहत्यांना कोट्यवधींचा गंडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
